आई-वडिलांसोबत गप्पा मारताना झालेल्या किरकोळ वादानंतर रागाच्या भरात 25 वर्षीय तरुणीने राहत्याघरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास सिडको एन-7 भागात घडली. प्रतीक्षा भरत काळे वय-25 (रा.एन-7, सिडको) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदन साठी रुग्णालयात हलविला आहे.या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे.